विशाळगड येथील वन विभागाच्या भूमीवरील अतिक्रमणे तातडीने काढा !

वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश !

सांगली, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर वन विभागाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे  विशाळगडाचे पावित्र्य नष्ट होत असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत, असा आदेश वन विभागाला राज्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये दिला.

१. विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी २५ फेब्रुवारी या दिवशी मंत्रालयामध्ये वनमंत्री श्री. गणेश नाईक यांची भेट घेत विशाळगडावरील वन विभागाच्या भूमीवरील अतिक्रमणे काढण्याच्या संदर्भात आदेश देण्याची आग्रही मागणी केली.

२. या मागणीनंतर वनमंत्री श्री. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकार्‍यांची बैठक झाल्यावर मंत्री श्री. गणेश नाईक यांनी हे आदेश दिले.

  • विशाळगडाचे पावित्र्य जतन करण्यासाठी वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने भुईसपाट करावीत, तसेच गडांचे विद्रुपीकरण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी दिले.
  • राज्यातील वन विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या सर्व गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणांविषयी वन विभागाने आढावा घ्यावा, अशी मागणी श्री. नितीन शिंदे यांनी केली. श्री. गणेश नाईक यांनी ही मागणी मान्य करून तसे आदेश दिले.