उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. विद्याश्री मुकुंद मोगेर ही या पिढीतील एक आहे !
‘कु. विद्याश्री मोगेर हिची तिच्या आईच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. वय १ ते ३ मास

अ. ‘विद्याश्रीच्या अंगावर ती १ महिन्याची असल्यापासून दैवी कण दिसू लागले. तिची प्रकृती बरी नसतांना दैवी कण अधिक दिसायचे.
आ. विद्याश्री मुद्रा करून झोपत असे.
इ. तिची जन्मपत्रिका गावातील एका प्रमुख आचार्यांना दाखवली, तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘बाळाचा जन्म चामुंडेश्वरी जयंतीच्या दिवशी मध्यरात्री झाला आहे. त्यामुळे तिच्यामध्ये देवीसारखा क्षात्रभाव आहे.’’
२. वय ९ मास ते १ वर्ष
२ अ. सात्त्विक गोष्टींची आवड असणे
१. आम्ही नामजपाच्या यंत्रावर नामजप लावला, तर ती ऐकत असे आणि रात्री नामजप यंत्राच्या जवळ जाऊन झोपत असे.
२. आम्ही भजने लावल्यावर ती आनंदाने ऐकत असे.
३. मी वहीत नामजप लिहित असे. विद्याश्री त्या लिहिलेल्या नामजपाकडे नेहमी पहात असे.
४. ती नेहमी देवाला आणि मोठ्या माणसांना नमस्कार करते.
२ आ. गुरुंप्रती भाव : एकदा मी तिला घेऊन सेवाकेंद्रात गेले होते. तेव्हा ती ध्यानमंदिरात जाऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर गुडघे टेकून बसली आणि त्यांना ‘बाबा’ अशी हाक मारत होती. ते पाहून माझी भावजागृती झाली.
३. वय ४ ते ९ वर्षे
३ अ. ती नेहमी हसतमुख असते.
३ आ. व्यवस्थितपणा : ती तिच्या सर्व वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवते.
३ इ. इतरांना साहाय्य करणे : ती मला घरची सर्व कामे आणि सेवा यांमध्ये साहाय्य करते.
३ ई. सात्त्विक पोशाख करणे : एकदा विद्याश्रीला तिच्या आजीने (विद्याश्रीच्या आईची आई, श्रीमती लक्ष्मी कालिदास, वय ६४ वर्षे) पॅन्ट-शर्ट घालायला सांगितले. तेव्हा विद्याश्री म्हणाली, ‘‘मला मुली घालतात, तसेच कपडे घालायला आवडतात. मला मुलांचे कपडे घालायला आवडत नाहीत.’’
३ उ. चुकांविषयी संवेदनशीलता : विद्याश्रीला तिची चूक सांगितली, तर ती लगेच चूक स्वीकारते. त्या वेळी तिला कितीही रागावले, तरीही ती शांत राहून ऐकून घेते.
३ ऊ. सेवेची ओढ : तिला लहानपणापासून सेवा करायला पुष्कळ आवडते. कोणतीही सेवा दिली, तरी ती मन लावून करते. गेल्या १ वर्षापासून ती ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्ग ऐकत आहे.’
४. कु. विद्याश्रीचे स्वभावदोष
आळशीपणा, विसराळूपणा आणि वेळेचे पालन न करणे’
– सौ. सौम्या मुकुंद मोगेर (कु. विद्याश्रीची आई), शिवमोग्गा, कर्नाटक. (१०.६.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.