कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

सदनिका घोटाळा प्रकरण

माणिकराव कोकाटे

जामिनाचा अर्ज न्यायालयाकडून संमत !

नाशिक – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून २ वर्षांची कारावासाची शिक्षा आणि ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. २० फेब्रुवारी या दिवशी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. कोकाटे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने संमत केला आहे. शिक्षेच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कोकाटे यांनी म्हटले आहे.

वर्ष १९९५ मध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या घोटाळ्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा प्रविष्ट केला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने आता कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना वरील शिक्षा सुनावली.