जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने  आज कोकणातील कर्तृत्ववान नेत्यांचा सत्कार

जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

रत्नागिरी – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ वाजता कोकणातील कर्तृत्ववान नेत्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनी प्रदीर्घकाळ राजकारणात राहून या भागाची सेवा केली आहे. कोकणाला नावलौकिक मिळवून दिला आहे. हा सत्कार जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. येथील सुंदरगडावर संतशिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन सोहळा चालू आहे.

या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे विकासमंत्री नितेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार भास्कर जाधव, आमदार नीलेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार किरण (भैय्या) सामंत यांचा समावेश आहे. या वेळी उल्हास घोसाळकर आणि प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित असणार आहेत.