|

नवी देहली – अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांच्या विरोधात बोलण्याचा कुणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर ते काय आहे ? या व्यक्तीच्या मनात काहीतरी घाणेरडे आहे. तुझे शब्द पालकांना आणि बहिणींना लाज वाटतील, असेच आहेत. संपूर्ण समाजाला याची लाज वाटेल. आम्ही तुझ्याविरुद्धचे गुन्हे रहित का करावेत किंवा एकत्र (क्लब) का करावेत ? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने यू ट्यूबर रणवीर अलाहबादिया याला विचारला. या वेळी न्यायालयाने अलाहाबादियाला अटकेवर अंतरिम स्थगिती दिली आहे. यू ट्यूब शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये अलाहबादिया याने आई-वडिलांच्या संदर्भात अत्यंत अश्लील विधान केले होते. यानंतर त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले. यामुळे त्याने सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
सर्वाेच्च न्यायालयाने अलाहाबादियाचे पारपत्र ठाणे पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश दिले आणि म्हटले की, ते न्यायालयाच्या पूर्व अनुमतीविना भारत सोडणार नाहीत.