तेलंगाणातील काँग्रेस सरकारची सरकारी मुसलमान कर्मचार्यांना भेट
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणातील काँग्रेस सरकारने मुसलमान सरकारी कर्मचार्यांना रमझानच्या महिन्यात एक घंटा आधी कार्यालय सोडण्याची अनुमती देणारा आदेश दिला आहे. मुख्य सचिवांनी प्रसारित केलेल्या आदेशानुसार मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, सरकारी मंडळे (बोर्ड) आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी रमझान महिन्यात दुपारी ४ वाजता कार्यालयाबाहेर पडू शकतील. ही सुविधा २ मार्च ते ३१ मार्च पर्यंत लागू असेल. तथापि कोणत्याही आपत्कालीन सेवेची आवश्यकता असल्यास कर्मचार्यांना थांबावे लागेल.
हिंदूंच्या सणांच्या वेळी अशी सवलत का दिली जात नाही ? – भाजपचे स्थानिक आमदार टी. राजा सिंह

तेलंगाणाच्या सरकारच्या या निर्णयावर भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस सरकारने ज्या प्रमाणे मुसलमान कर्मचार्यांसाठी रमझानच्या महिन्यात कामाच्या वेळेत सवलत दिली, तशी सवलत हिंदूंच्या सणांच्या वेळी का दिली नाही ? हिंदूंच्या महाशिवरात्री, नवरात्री आदी सणांच्या वेळी ही सवलत का नाही दिली ? यापूर्वीचे मुख्यमंत्री के.सी.आर्. राव यांच्या सरकारला आम्ही ८ वे निजाम म्हणत होतो; मात्र आताचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे नववे निजाम ठरले आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमानांचे लांगूलचालन करणार्या काँग्रेसकडून वेगळी काय अपेक्षा करणार ? |