विद्यार्थ्‍यांना हिंदु राजांचे श्रेष्‍ठत्‍व शिकवा !- महंत अरुण दासजी महाराज, जगन्‍नाथ धाम शिबिर

महंत अरुण दास महाराज (डावीकडे) यांना हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याच्‍या माहितीची पुस्‍तिका देतांना सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रयागराज – ज्‍या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्‍त्रियांवर अत्‍याचार केले, त्‍याच्‍याविषयी आपल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांना ‘अकबर श्रेष्‍ठ होता’, असे शिकवण्‍यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ होते ?’, हे शिकवले पाहिजे, असे वक्तव्‍य जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्यजी महाराज यांचे उत्तराधिकारी तथा जगन्नाथ धाम शिबिराचे महंत अरुण दासजी महाराज यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्‍रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. युवकांना चांगल्या प्रकारे घडवण्याचे काम हिंदु जनजागृती समिती करत आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी समितीच्या कार्याविषयी काढले