मेदनकरवाडीत (पुणे) श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साहात !

श्री खंडोबा देवस्थान, मेदनकरवाडी

मेदनकरवाडी (जिल्हा पुणे) – श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मेदनकरवाडीमध्ये श्रींच्या मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साहात चालू झाला आहे. मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात प्रसिद्ध आहे. खंडोबा मंदिराच्या समोर रथसप्तमीनिमित्त बैल परंपरेने गाडापूजन करण्यात आले. खंडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे श्रींचे पुजारी अरुण तोडकर यांनी सांगितले. उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर विद्युत् रोषणाई, पुष्प सजावट करण्यात आली. पुष्पसजावटीने सजलेला वैभवी मानाचा गाडापूजन उत्साहात झाले. या वेळी भाविकांनी गर्दी केली होती. श्री खंडोबा महाराज यांचे सेवेकरी म्हणून विविध परिसरांतून मानकरी येतात. नवसाचा देव पावतो म्हणून भाविक येतात. पहाटे ५ पासून श्री खंडोबा महाराज यांची पूजा आणि देवाची पदे रथसप्तमीदिनी गायली गेल्याचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ यांनी सांगितले. रथसप्तमीदिनी श्रींची पूजा, आरतीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.