उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नीललोहित नायक हा या पिढीतील एक आहे !
माघ कृष्ण द्वितीया (१४.२.२०२५) या दिवशी रायचुरू, कर्नाटक येथील कु. नीललोहित नायक याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
कु. नीललोहित नायक याला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. जन्मापूर्वी
‘नीललोहितची आई (सौ. राजेश्वरी नायक) गरोदरपणात ‘श्रीमद्भागवत’ ऐकत होती. ती ‘कुलदेवता आणि श्रीराम’ यांचा नामजप लिहीत होती.’
२. जन्म ते ९ वर्षे
२ अ. चि. नीललोहित रडत असतांना भक्तीगीत म्हटले की, तो शांत होत असे.
२ आ. आमच्या घरी गायी आल्यावर नीललोहित त्यांना खाऊ घालायचा आणि त्यांच्याशी खेळत रहायचा.
२ इ. सेवाभाव : नीललोहित आई-वडिलांच्या समवेत समष्टी सेवा करतो. तो अध्यात्मप्रसाराच्या विविध सेवा करतो. तो सेवा करतांना आनंदात असतो.
२ ई. देव आणि गुरु यांच्याप्रती भाव
१. नीललोहित नेहमी श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करणे, नैवेद्य दाखवणे आणि मूर्तीपुढे नृत्य करणे, अशा कृती करतो. तो केवळ कृष्णाच्या अनुसंधानात असतो.
२. तो प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ‘गोविंद’, असे म्हणायचा. ‘इतरांना परम पूज्य गुरुदेव ‘गोविंद’ झाले आहेत, हे का समजत नाही ?’, असे तो मला विचारायचा.’
– श्री. मारुति नायक (वडील), रायचुरू, कर्नाटक. (१७.७.२०२४)
_______________________________________________
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.