
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील देवास जिल्ह्यातील ५४ गावांची नावे पालटण्याची घोषणा केली आहे. देवास जिल्ह्यातील पीपलरांवा गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष रायसिंह सैंधव यांनी गावांची नावे पालटण्याबाबत एक सूची सोपवली. त्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मंचावरूनच ५४ गावांची नावे पालटण्याची घोषणा केली. तसेच या गावांची नावे पालटण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले. यापूर्वी जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री शाजापूर जिल्ह्याच्या दौर्यावर असतांना त्यांनी मंचावरूनच ११ गावांची नावे पालटण्याची घोषणा केली होती.
देवास जिल्ह्यामधील ज्या ५४ गावांची नावे पालटण्यात येणार आहेत, त्यांत मुरादपूर, हैदरपूर, शमशाबाद, इस्लामनगर अशी इस्लामी नावे आहेत. मुख्यमंत्र्यांना जिल्हाध्यक्षांनी नव्या नावांची सूचीही सोपवली आहे. त्यात मुरादपूरचे मुरलीपूर, हैदरपूरचे हिरापूर, शमशाबादचे श्यामपूर, इस्माइल खेडी गावाचे ईश्वरपूर, अलीपूरचे रामपूर, नबीपूरचे नयापूर आणि मिर्झापूरचे मीरापूर अशी नावे सूचवण्यात आली आहेत.
संपादकीय भूमिकाएका जिल्ह्यातील नावे पालटण्यापेक्षा संपूर्ण राज्यातील इस्लामी नावे पालटण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! |