Sweden School Firing : स्विडनमधील प्रौढांच्या शाळेत झालेल्या गोळीबारात १० जण ठार

  • जानेवारीमध्ये स्विडनमध्ये झाले ३१ स्फोट

  • गुन्हेगारीमध्ये स्थलांतरितांचा ९० टक्के सहभाग !

स्टॉकहोम (स्विडन) – स्टॉकहोमपासून २०० कि.मी. पश्‍चिमेला असलेल्या ओरेब्रो शहरातील रिसबर्गस्का शाळेत ४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता करण्यात आलेल्या गोळीबारात १० जण ठार, तर काही जण घायाळ झाले. या आक्रमणामागील हेतू अद्याप समजू शकलेला नाही. ही प्रौढांची शाळा होती. स्थानिक माध्यमांच्या वृत्तांमध्ये गोळीबार करणारा सीरिया वंशाचा असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी २०२५ मध्ये स्विडनमध्ये स्फोटांच्या ३१ घटना घडल्या आहेत. तसेच कुराण जाळणारे सलवान मोमिका यांचीही हत्या करण्यात आली आहे.

१. स्फोटांनंतर स्टॉकहोमची तुलना इराकची राजधानी बगदादशी केली जात आहे. आता भाड्याने घरे देणारे दलाल विज्ञापनांमध्ये ‘या भागात बांबस्फोटाची कोणतीही घटना घडलेली नाही’, असा उल्लेख करत आहेत.

२. गुन्हेगारीच्या संदर्भातील तज्ञ अर्दावन खोशनुद यांनी सांगितले की, स्विडनमधील सुमारे ९० टक्के गुन्हेगारांची पार्श्‍वभूमी स्थलांतरितांची आहे; परंतु ते कोणत्याही धर्मावर आधारित नाहीत. हे लोक अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी आहेत. यामुळेच देशात टोळीयुद्धासारख्या घटना वाढल्या आहेत.