अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा प्रशासनाला आदेश

वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणने माझी हत्या केल्यास त्याला पूर्णपणे नष्ट करण्यात यावे, असे निर्देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी देशाच्या प्रशासनाला दिले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने इराणवर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. हा कट अमेरिकेच्या यंत्रणांनी उधळून लावला होता.
डॉनल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध ‘अधिकाधिक दबाव’ मोहीम पुन्हा चालू करण्याच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार अमेरिकेच्या अर्थ विभागाला इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.