महाशिवरात्र कीर्तन महोत्सवानिमित्त संकल्प पूजन आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा !

संकल्प करून पूजन करतांना श्री. माधवराव गाडगीळ, तसेच अन्य

मिरज, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील श्री काशीविश्वेश्वर देवालयात महाशिवरात्र कीर्तन महोत्सवाच्या निमित्त समर्थभक्त श्री. माधव गाडगीळ मित्र परिवाराच्या वतीने पूजा-अभिषेक करण्यात आला. या वेळी श्री. कुश आठवलेगुरुजी यांच्याकडून विधीवत् संकल्प करण्यात आला. श्री. विजय गोखले आणि सौ. गीता गोखले यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन, तसेच श्रीमती पद्मावती बाळकाकू यांच्या हस्ते फलकपूजन करण्यात आले. या वेळी माधवराव गाडगीळ मित्र परिवारातील सदस्य आणि भाविक यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली.

हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा सांगतांना श्री. गिरीष पुजारी, श्री. माधवराव गाडगीळ, तसेच अन्य

सौ. मुग्धा गाडगीळ, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, देवस्थानचे पुजारी सुनील गुरव, सर्वश्री सुरेश पाटील, क्रांती खटावकर, बाळकृष्ण सूर्यवंशी, श्रेयस गाडगीळ, रावसाहेब चौंदीकर, नंदकुमार भट, प्रकाश जोशी यांसह अनेक जण उपस्थित होते.