६ जणांना अटक !

वडकी (यवतमाळ), ४ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील नागपूर भाग्यनगर मार्गावरून तेलंगाणात कत्तलीसाठी जाणार्या २ मालवाहतूक वाहनांत २५ गोवंशियांना कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने वडकी पोलिसांनी सापळा लावून पकडले. यात २ मालवाहतूक वाहनांसमवेत ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि २ धर्मांधांसमवेत ४ जणांना अटक करण्यात आली. २५ गोवंश वणी तालुक्यातील रासा येथील गोरक्षकांकडे सोपवण्यात आला.
संपादकीय भूमिका :राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना गोवंशियांची तस्करी होणे, हे पोलिसांचा धाक संपल्याचेच दर्शवते ! |