Amit Shah On Mahakumbh : महाकुंभ सनातन संस्कृतीचे अद्वितीय प्रतीक !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभक्षेत्री त्रिवेणी संगम येथे स्नान (डावीकडे) आणि गंगा नदीचे पूजन करताना (उजवीकडे)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभक्षेत्री त्रिवेणी संगम येथे स्नान आणि गंगा नदीचे पूजा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा एकतेचा महाकुंभ असून ते सनातन संस्कृतीचे अद्वितीय प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’वर ही प्रतिक्रिया दिली.

शहा यांनी महाकुंभाच्या भव्य उत्सवाला ‘एकतेचा महाकुंभ’ असे संबोधले. ते म्हणाले, ‘‘महाकुंभ ही आपल्या सनातन संस्कृतीची अविरत धारा आणि अखंड परंपरेचे प्रतीक आहे. हा उत्सव आपल्या जीवन-दर्शनावर आणि समरसतेवर आधारित परंपरा दर्शवतो.’’