पारतंत्र्याचा रोग बरा करण्यासाठी तो समूळ काढणारी सर्वंकष संघटनेची रामबाण मात्रा हवी !

पारतंत्र्याचा रोग बरा करण्यासाठी केवळ राजकीय, केवळ सामाजिक वा केवळ धार्मिक अशी कोणतीच योजना करून भागत नाही. रोगाचे मूळच खणून काढणारी सर्वंकष संघटनेची रामबाण मात्रा त्यावर द्यावी लागते; कारण एका पारतंत्र्याच्या रोगासमवेत राष्ट्रपुरुषाच्या शरिरात अनेक लहान-मोठे, साधे आणि भयंकर असे रोगही वस्ती करू लागतात. त्याला एकच औषध, ‘राष्ट्रघटकांना स्वत्वाची जाणिव करून देऊन त्यांची संघटना करणे’; मात्र हे औषध घ्यावयाचे, तर पथ्ये फार कडक सांभाळावी लागतात. औषध कडक असल्याने काळजीपूर्वक पथ्य सांभाळले, तरच ते गुण देईल.

(साभार : ‘अज्ञातांची वचने’ या पुस्तकातून, संचालक : श्री. अमरेंद्र गाडगीळ)