थिरूवनंतपूरम् (केरळ) – मलप्पूरम्मध्ये एका अल्पवयीन मुलीवर २ वर्षे बलात्कार करणार्या उनैस (वय २९ वर्षे) याला न्यायालयाने ८७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ४ लाख ६० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम अल्पवयीन पीडितेला दिली जाईल. उनैस याने दंडाची रक्कम न भरल्यास त्याच्या शिक्षेतही वाढ होणार आहे. पॉक्सोसह इतर गुन्ह्यांसाठी न्यायालयाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे. वर्ष २०२० ते २०२२ या काळात उनैस याने पीडितेच्या घरात बळजबरीने घुसून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला धमकावल्यानंतर त्याने तिचे नग्न छायाचित्रही काढले आणि ते प्रसारित करण्याची धमकी दिली.
संपादकीय भूमिकाअशांना आजन्म पोसण्याऐवजी त्यांना फाशीचीच शिक्षा करणे आवश्यक आहे, असेच जनतेला वाटते ! |