काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांचे संतापजनक विधान !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : भारत सरकारने रोहिंग्या निर्वासितांना येथे आणले आहे. आम्ही त्यांना येथे आणले नाही. सरकारने त्यांना येथे स्थायिक केले आहे आणि जोपर्यंत ते येथे आहेत, तोपर्यंत त्यांना पाणी आणि वीज देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी रोहिंग्यांचे समर्थन केले. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने रोहिंग्यांना देण्यात आलेली पाणी आणि वीज जोडणी तोडली होती.
भाजपने काही दिवसांपूर्वीच टीका करतांना म्हटले होते की, जम्मू-काश्मीर राज्यातील रोहिंग्या आणि बांगलादेशी निर्वासित यांना पाणी अन् वीज जोडणी दिली जात आहे; कारण ते एका विशिष्ट समुदायाचे आहेत आणि राज्य सरकार त्यांना संरक्षण देऊ इच्छित आहे. जम्मूमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी निर्वासितांना वसवणे, हे एक राजकीय षडयंत्र आहे. हे होऊ देणार्यांची ओळख पटवण्यासाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी.
संपादकीय भूमिकायातून फारूख अब्दुल्ला यांची खरी मानसिकता पुन्हा उघड होते ! बांगलादेशात हिंदूंवर मुसलमानांकडून होत असलेले अत्याचार ठाऊक नसल्याचे म्हणणारे फारूख अब्दुल्ला स्वत:च्या धर्मबांधवांची मात्र काळजी घेतात ! फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांना बहुसंख्य हिंदू असणार्या देशात स्वीकारले जाते, हे लज्जास्पद ! |