ब्रिटनच्या ख्रिस्त्यांनी ‘राजे चार्ल्स यांनी धर्मांतर केले आहे का ?’ असा प्रश्न विचारत व्यक्त केला संताप !
(इस्टर संडे म्हणजे ‘क्रॉस’वर चढवल्यानंतर येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्याला कबरीत पुरण्यात आले. बायबलनुसार येशू ख्रिस्ताचा पुनर्जन्म मृत्यूनंतर तिसर्या दिवशी, म्हणजे रविवारी झाला; या चमत्कारिक घटनेला ‘ईस्टर संडे’ म्हणतात.)

नवी देहली – भारताप्रमाणे आता ब्रिटनमध्येही मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांपासून राजे चार्ल्स तृतीय यांच्यापर्यंत पोचलेला आहे. राजे चार्ल्स तृतीय यांनी राजघराण्याकडून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ख्रिस्त्यांच्या ‘ईस्टर’ सणानिमित्त एक संदेश दिला आहे. या संदेशात अन्य विचारांसह इस्लामचे कौतुक करण्यात आले आहे. इस्टर संदेशात इस्लामचा उल्लेख केल्यामुळे ब्रिटनचे ख्रिस्ती संताप व्यक्त करत आहेत. सामाजिक माध्यमांत ते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ‘राजे चार्ल्स तृतीय यांनी धर्मांतर केले आहे का ?’ असा प्रश्न विचारला जात आहे.
🇬🇧 On Easter Sunday, King Charles III praises Islam in his message!
British Christians fume: “Has the King converted?”
When citizens are alert, even monarchs are questioned!
India’s Hindus must learn to stand up for their faith & hold leaders accountable too! 🙏🔥
PC:… pic.twitter.com/BZaIp4X9pM
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2025
ब्रिटनचा राजा ख्रिस्ती धर्माचा रक्षक मानला जातो. असे मानले जाते की, इस्लामविरुद्धच्या धर्मयुद्धाचे नेतृत्व इंग्लंडने केले होते. अशा परिस्थितीत ‘कॅथॉलिक ख्रिस्ती लोक ‘चार्ल्स त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत आहेत का ?’, असा प्रश्न विचारत आहेत.
ब्रिटनचे होत आहे इस्लामीकरण !
ब्रिटनच्या कारागृहात मोठ्या संख्येने जिहादी आतंकवादी आणि मुसलमान गुन्हेगार असून त्यांनी कारागृहांवर नियंत्रण मिळवले आहेत. तेथे त्यांनी त्यांचा शरीयत कायदा लागू केला असून प्रशासन त्यांच्यापुढे हतबल झाले आहे.
१. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. मुसलमान दुसर्या क्रमांकांची लोकसंख्या झाली आहे. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी लोकांव्यतिरिक्त, इराण, इराक, अफगाणिस्तान आणि सीरिया या देशांमधील निर्वासित मुसलमानदेखील आहेत. ब्रिटनमध्ये सध्या १ सहस्र ८२५ हून अधिक मशिदी आहेत. ब्रिटीश भूमीवर ३० हून अधिक शरिया परिषदा सक्रीय आहेत.
२. वर्ष २०११ मध्ये ब्रिटनमध्ये २७ लाख मुसलमान होते. वर्ष २०२१ मध्ये ते वाढून ३९ लाख झाले. ब्रिटनच्या लोकसंख्येच्या ६.५ टक्के मुसलमान आहेत. राजधानी लंडनमध्ये ४० टक्के ख्रिस्ती आणि १५ टक्के मुसलमान आहेत, तर हिंदु केवळ ५ टक्के आहेत.
३. जर ब्रिटनमधील मुसलमानांची लोकसंख्या वेगाने वाढत राहिली, तर वर्ष २०५० पर्यंत त्यांची लोकसंख्या ६.५ वरून ११ टक्क्यांपर्यंत वाढेल, तर ख्रिस्ती लोकसंख्या ६४ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत घसरेल.
४. ब्रिटनमधील अनेक शहरांमध्ये महापौरपद बर्याच काळापासून मुसलमानांकडे आहे. पाकिस्तानी वंशाचे सादिक खान सलग तिसर्यांदा लंडनचे महापौर बनले आहेत.
मजूर पक्षाच्या (लेबर पार्टीच्या) रुखसाना फयाज यांचीही एल्.बी. न्यूहॅम काऊंटीमध्ये महापौर म्हणून निवड झाली आहे. एल्.बी. लुत्फूर रहमान हे टॉवर हॅमलेट्सचे महापौर आहेत. लुबना अर्शद गेल्या वर्षी ऑक्सफर्डच्या लॉर्ड मेयर म्हणून निवडून आल्या.
५. ब्रिटनमध्ये वाढत्या मुसलमान लोकसंख्येसह कट्टरतावाद, द्वेष आणि धार्मिक दंगली यांमध्ये वाढ झाली आहे. हमासच्या इस्रायलवरील आक्रमणानंतर ब्रिटनमध्ये मुसलमानांविषयीचा द्वेष वाढला आहे. वर्ष २०२४ मध्ये इस्लामद्वेषाच्या ५ सहस्र ८३७ घटना नोंदवल्या गेल्या, ज्या २०२३ मध्ये ३ सहस्र ७६७ होत्या.
संपादकीय भूमिकाब्रिटनची जनता जागरूक असल्याने ती थेट राजाला अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करते. भारतातील हिंदूंनी यावरून धर्मप्रेम शिकले पाहिजे आणि त्यासाठी जाब विचारण्याची सिद्धता ठेवली पाहिजे ! |