१. आधार वाटणे
‘कु. भाविनी कापडिया (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४२ वर्षे) यांचे वागणे-बोलणे अत्यंत सहज आणि आदरयुक्त असते. त्याचप्रमाणे त्यांना एखादे सूत्र विचारल्यास त्या आवर्जून प्रतिसाद देतात. त्यामुळे त्यांचा आधार वाटतो. ‘कलेशी निगडित एखाद्या सेवेसाठी कोण साहाय्य करू शकेल ?’, असा विचार केल्यावर सर्वप्रथम कु. भाविनीताई यांचे नाव आठवते.
२. सहजपणे आणि गांभीर्याने चूक सांगणे
मध्यंतरी कलेशी निगडित सेवा करतांना काही चित्रांच्या संदर्भात माझ्याकडून एक चूक झाली होती. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कु. भाविनीताई यांना ती चूक मला सांगायला सांगितली. एरव्ही मला चुका स्वीकारणे कठीण जाते; पण कु. भाविनीताई यांनी इतक्या सहजतेने आणि गांभीर्याने चूक सांगितली की, मला ती चूक सहजतेने स्वीकारता आली.
३. इतरांना सेवेत साहाय्य करणे
कु. भाविनीताई यांचा संगणकावर सूक्ष्म-चित्र बनवण्याच्या सेवेत सहभाग असतो. आम्ही ज्ञानप्राप्तकर्ते साधक क्वचितच त्या सेवेत सहभागी असतो. असे असले, तरी त्यांच्या सेवेत आमच्या सेवेशी संबंधित एखादे सूत्र आल्यास त्या ते सूत्र आम्हाला लगेच कळवतात, उदा. अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर तेथील साधकांनी काही चांगल्या प्रतीची छायाचित्रे काढून कु. भाविनीताईंना त्यांच्या सेवेसाठी पाठवली होती. त्या वेळी ‘त्या चांगल्या प्रतीच्या छायाचित्रांचा उपयोग सूक्ष्म-परीक्षण करणार्या साधकांना होईल’, या विचाराने कु. भाविनीताई यांनी ती छायाचित्रे आम्हालाही पाठवली.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ३६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१.२०२४)
|