स्वच्छतेमागील शास्त्र विशद करणार्‍या अनुभूती

१. साधिकेने अंघोळीनंतर प्रसाधनगृह स्वच्छ केल्यावर काही वेळाने तेथे दैवी सुगंध येणे 

सौ. रंजना गडेकर

‘५.१२.२०१८ या दिवशी मी आश्रमाच्या स्त्री प्रसाधनगृहात अंघोळ केली. माझ्यानंतर कुणी आंघोळ करणारे नसल्याने मी पाणी टाकून ते प्रसाधनगृह स्वच्छ केले. नंतर थोड्या वेळाने मी पुन्हा तेथे गेले. तेव्हा मला दैवी सुगंध आला.

२. केर काढतांना वास्तूत असलेली त्रासदायक स्पंदने आणि वाईट शक्ती यांचेही उच्चाटन करणे अभिप्रेत असल्याने शास्त्रानुसार केर काढणे आवश्यक !

‘१२.१२.२०१८ या दिवशी मी आश्रमाच्या चौथ्या मजल्यावरील मार्गिकेत उभी होते. त्या वेळी एक साधिका तो मजला झाडत होती. ती माझ्या दिशेने झाडत येत होती. त्या वेळी मला माझ्याकडे दाब येत असल्याचे जाणवले. ती साधिका जसजशी माझ्या दिशेने येत होती, तसतसा माझ्या दिशेने दाब येत असल्याचे मला जाणवत होते. ती झाडत जशी माझ्या जवळ येत होती, तसे मला दाब जाणवण्याचे प्रमाणही वाढत होते. या अनुभूतीवरून ‘धर्मशास्त्राप्रमाणे वास्तु किंवा खोली येथील केर बाहेरच्या दिशेने झाडणे अपेक्षित आहे’, हे शास्त्र किती योग्य आहे’, ते माझ्या लक्षात आले. ‘केर काढणे, म्हणजे फक्त धूळ काढणे नसून वास्तूत असलेली त्रासदायक स्पंदने आणि वाईट शक्ती यांचेही उच्चाटन करणे होय’, असे मला वाटले.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (१५.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक