१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आणि अन्य सोहळे’ या ग्रंथातील चैतन्य सगळीकडे प्रक्षेपित होत आहे आणि स्वतःला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे जाणवणे
‘१२.७.२०२४ या दिवशी दुपारी १२.२० वाजता श्री. हेमंत जुवेकर यांनी मला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव आणि अन्य सोहळे’ हा ग्रंथ दिला. मी तो ग्रंथ हातात घेतल्या क्षणी मला त्यातील स्पंदने जाणवू लागली. मी तो ग्रंथ ‘प्लास्टिक’च्या वेष्टनातून बाहेर काढला आणि तो ग्रंथ पाहू लागले. त्या वेळी ‘त्या ग्रंथातील चैतन्य सगळीकडे प्रक्षेपित होत आहे आणि त्या चैतन्यामुळे मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला जाणवू लागले.
२. ‘ग्रंथातील चैतन्य अनाहतचक्रात जात आहे’, असे जाणवणे
त्या वेळी मी जुवेकरकाकांशी बोलत होते; म्हणून मी तो ग्रंथ तसाच ‘प्लास्टिक’च्या वेष्टनात घालून माझ्यासमोर भिंतीला उभा टेकवून ठेवला. तेव्हा ‘त्यातील चैतन्य माझ्या अनाहतचक्रात जात आहे’, असे मला जाणवले.
३. केळ्यांसारखा गोड वास येणे आणि ‘श्रीविष्णूचा प्रसाद मिळाला आहे’, असे वाटणे
नंतर ५ मिनिटांनी मला केळ्यांचा गोड वास येऊ लागला. तेव्हा मला ‘श्रीविष्णूचा प्रसाद मिळाला आहे’, असे वाटले. ‘श्री सत्यनारायणाच्या पूजेत केळे अनिवार्य असते, तसा मला नारायणाने प्रसाद दिला’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.
मला अशी शब्दातीत अनुभूती दिल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. स्मिता कुळकर्णी, उज्जैन (१२.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |