डब्यात मांसाहारी बिर्याणी घेऊन शाळेत आलेल्या मुसलमान विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांनी हाकलले
अमरोहा (उत्तरप्रदेश) – तुमचा मुलगा डब्यामध्ये मांसाहार आणतो आणि म्हणतो की, तो इतरांनाही मुसलमान बनवणार. अशा मुलांना मी काहीही शिकवू शकत नाही, जे मोठे होऊन आमची मंदिरे नष्ट करतील. तुम्ही लोक घरी असे संस्कार करता’, असे उत्तरप्रदेशातील बिजनौर येथील एका नामांकित शाळेचे मुख्याध्यापक अवनीश शर्मा यांनी ७ वर्षांच्या मुसलमान मुलाच्या आईला सांगितले. डब्यामध्ये मांसाहारी बिर्याणी आणल्यामुळे मुलाला शाळेतून हाकलून देण्यात आले. यामुळे आई मुख्याध्यापकांना भेटायला गेली असता दोघांमध्ये वाद झाला. या संवादाशी संबंधित एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
We don’t want such children in our school, who would grow up to destroy temples. – Principal Avneesh Sharma.
▫️The Principal expelled a Mu$|!m student for bringing non-vegetarian biryani in a box at school.
▫️Mu$|!m community has objected the decision.
👉 Why is it… pic.twitter.com/HgSC9XTkHj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2024
मुलाच्या आईने सर्व आरोप फेटाळून लावले. तिने डब्यामध्ये मांसाहारी बिर्याणी दिल्याचे म्हणणे फेटाळून लावले. ती म्हणाली की, गेल्या काही महिन्यांपासून वर्गातील इतर मुले त्याच्याबद्दल मुसलमान आणि हिंदू म्हणून बोलत आहेत. काही मुलांची नावे घेऊन आईने तिच्या मुलाशी भांडण केल्याचेही सांगितले. यानंतर मुख्याध्यापक शर्मा यांनी मुलाच्या आईला बाहेर जाण्यास सांगितले, तसेच सुरक्षारक्षकांना बोलवून हाकलून देण्याची आणि पोलिसांना बोलावण्याची चेतावणी दिली.
या प्रकरणावर मुसलमानांकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. अमरोहाचे उपजिल्हाधिकारी सुधीर कुमार यांनी जिल्हा निरीक्षक आणि मूलभूत शिक्षण अधिकारी यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले. यासाठी ३ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाशाळेत येतांना मांसाहारी पदार्थ घेऊन येण्याची मानसिकता असणार्यांना मुख्याध्यापक शाळेतून हाकलून देत असतील, तर त्यात चुकीचे काय ? शाळेचे पावित्र्य राखण्याचे दायित्व त्यांनी पार पाडल्याचेच यातून लक्षात येते ! |