पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती  केली असून हे सर्व  अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सवर्सामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.

पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज

तू विजय पताका घेऊन हाती ।
मिळविलीस ती वैकुंठ मुक्ती ।। १ ।।

देह संघर्षावर करून मात ।
तोडिलेस तू देहाचं नातं ।। २ ।।

सार्थक तू नर जन्माचे केलेस ।
झालास जड जिवांचा आदर्श  ।। ३ ।।

सर्व आप्त स्वकीय मायेत गुंतले ।
त्यांनी तुला काही नाही जाणले ।। ४ ।।

जगी अवतरला तुम्ही संन्यासी ।
अवघे जाणून घेण्या ईश्वराशी ।। ५ ।।

अखेरचा हा आमचा नमस्कार ।
मनोभावे त्याचा करावा स्वीकार ।। ६ ।।

राजूदादा (टीप) सर्वांचे होते आवडते ।
त्यांनी ईश्वरासी जोडले अभंग नाते ।। ७ ।।

– पू. ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)

टीप – सनातनचे दिवंगत साधक कै. राजाराम चौगले (वर्ष २०१४ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक