ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे विधान
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये आठवडाभरापासून चालू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले आहे, ‘दंगलखोरांना कायद्याच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली जाईल. अटक केलेल्यांना आठवडा संपण्यापूर्वी न्यायालयाकडून ठोस शिक्षा दिली जाईल, अशी आशा आहे.’ गेल्या महिन्यात ब्रिटनच्या साऊथपोर्ट शहरातील एका डान्स क्लबमध्ये चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात ३ मुलींचा मृत्यू झाला होता, तर १० जण घायाळ झाले होते. संशयित मुसलमान निर्वासित असल्याची अफवा पसरल्याने स्थलांतरित मुसलमान आणि मशिदी यांवर आक्रमणे झाली. त्यावर पंतप्रधान स्टार्मर यांनी वरील विधान केले आहे.
मुसलमानांवरील आक्रमणे सहन करणार नाही ! – स्टार्मरबांगलादेशात हिंदूंवर गेले काही दिवस आक्रमणे चालू आहेत; मात्र बांगलादेशातून कोणत्याच नेत्याकडून ‘हिंदूंवरील आक्रमणे सहन करणार नाही’, असे म्हटले गेलेले नाही. भारतीय शासनकर्त्यांनही असे अजून विधान केलेले नाही. जगात मुसलमानांच्या रक्षणासाठी प्रयत्न होतात; मात्र हिंदूंच्या नाही ! स्टार्मर पुढे म्हणाले की, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनमध्ये सुमारे ६ सहस्र विशेष दंगल नियंत्रण पोलीस तैनात केले जात आहेत. कारण काहीही असो, हा निषेधाचा मार्ग नाही. ही शुद्ध हिंसा आहे आणि आम्ही मशिदी किंवा आमचा मुसलमान समुदाय यांच्यावर आक्रमणे सहन करणार नाही. या दंगलींमध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या विरोधात कायदा पूर्ण शक्तीने काम करेल. |