ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिल्यानंतर बांगलादेशामध्ये आता अंतरिम सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठी राष्ट्रपतीपदासाठी नोबेल पारितोषिक विजेते महंमद युनूस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ६ ऑगस्टच्या रात्री बांगलादेशाच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, तसेच तिन्ही संरक्षणदलाचे प्रमुख उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
महंमद युनूस शेख हसीना यांचे विरोधक मानले जातात. तसेच ते भारतविरोधीही विधाने करत असतात.
माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची नजरकैदेतून सुटका
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात आता सैन्याकडून देश चालवण्यात येत आहे. सैन्याने बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनल पार्टी पक्षाच्या अध्यक्षा खलिदा झिया (वय ७८ वर्षे) यांची नजरकैदेतून सुटका केली आहे. त्या शेख हसीना यांच्या कट्टर विरोधक आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली त्यांना कारावासाची शिक्षा झाली होती. ती भोगल्यानंतर त्या नजरकैदेत होत्या. त्यांना आता उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर खलिदा झिया म्हणाल्या की, आपल्याला आपला देश घडवायचा आहे. जे घडत आहे ते देशासाठी चांगले नाही. देशात चालू असलेली जीवित आणि वित्त हानी थांबायला हवी.