प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे (गोळा किंवा पेटका येणे), हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.
विशेषतः वात-पित्त वाढवणार्या पावसाळ्यासारख्या ऋतूमध्ये असे रुग्ण बरेच दिसतात. अशा सगळ्यांना तिथे फक्त तेल लावण्याचा लाभ होत नाही. औषधांमध्ये बाकी वेदनाशामक औषधांसह पित्ताला पचनावर काम, आंबट-खारट-तिखट कमीत कमी खाणे आणि योगासनांसारखा व्यायाम हे लांबपर्यंत उपयोगी ठरते.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२०.७.२०२४)
(साभार : वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये यांचे फेसबुक)