इस्लामाबाद – अजरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव हे पाकिस्तानच्या दौर्यावर होते. या वेळी त्यांनी काश्मीरच्या सूत्रावरून पाकिस्तानचे समर्थन केले. भारताचे नाव न घेता ते म्हणाले की, काश्मिरींच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या अधिकारांचे उल्लंघनही होत आहे. अजरबैजान हा एक मुसलमान देश आहे. आमचे भारताशी चांगले संबंध आहेत. अजरबैजानचे इस्रायलशीही चांगले संबंध आहेत. भारत आणि इस्रायल यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे.
‘इस्रायलची अर्थव्यवस्था बर्याच प्रमाणत अजरबैजानवर अवलंबून आहे’, असे म्हटले जाते. इस्रायल-हमास युद्धात अजरबैजान इस्रायलसमवेत उभा राहिला. इस्रायलच्या साहाय्यामुळे अजरबैजानला नागोर्नो-कराबाख हे प्रांत कह्यात घेणे शक्य झाले होते.
संपादकीय भूमिकाकाश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे अन् पुन्हा भारताच्या अंतर्गत प्रश्नात नाक न खुपसण्याची तंबी दिली पाहिजे ! |