उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथील सहस्रताल शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या २२ गिर्यारोहकांच्या पथकातील एकूण ९ जणांचा खराब हवामानामुळे मृत्यू झाला आहे.
४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे. याच काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील हे गिर्यारोहक शिखरावर चढाई करण्यासाठी पोचले होते. त्यांच्याबरोबर एक स्थानिक मार्गदर्शकही होता. खराब वातावरणामुळे या गिर्यारोहकांचा मार्ग भरकटला. दाट धुके आणि बर्फवर्षाव यांमुळे या गिर्यारोहकांना येथील कोखली टॉपच्या तळावर रात्र काढावी लागली. त्या वेळी थंडीमुळे गिर्यारोहकांच्या या समूहातील ४ महिलांसह ५ जणांची प्रकृती खालावून मृत्यू झाला, तर ४ जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांमध्ये ४ महिला आहेत.