अयोध्या येथे झालेल्या श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सूक्ष्म१.२.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीचे आणि होतांनाचे चलचित्र पाहून केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे. आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

(भाग २) 

रामलला

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/760320.html

 ३. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तिच्यात जाणवलेले आध्यात्मिक पालट

टीप १ – मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, म्हणजे निर्गुण ईश्‍वरी तत्त्वाला सगुणात आणणे होय. काळानुसार समष्टीला सगुण शक्तीची आवश्यकता असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत मूर्तीतील श्रीरामतत्त्वात वाढ झाली. मूर्तीतील निर्गुण तत्त्व न्यून होऊन सगुण तत्त्वात वाढ झाली.

टीप २ – अनिष्ट शक्ती सूक्ष्मातून करत असलेल्या आक्रमणांमुळे प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीभोवती काही प्रमाणात त्रासदायक स्पंदने कार्यरत होती.

‘मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, म्हणजे निर्गुण ईश्‍वरी तत्त्वाला सगुणात आणणे होय.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४)

४. श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्री रामललाच्या मूर्तीकडे पहातांना शीतलता, हलकेपणा आणि आनंद जाणवून श्‍वासाची गती मंद होत होती. हा मूर्तीतील सकारात्मक ऊर्जेचा कुंडलिनीचक्रांवर होत असलेला परिणाम होता.

आ. श्री रामललाचे दर्शन घेतल्यावर प्रथम मूलाधार, त्यानंतर मणिपूर आणि शेवटी अनाहत या क्रमाने कुंडलिनीचक्रांवर स्पंदने जाणवली.

इ. मूर्तीतून ‘शून्य’ या निर्गुणाशी संबंधित नामजपाएवढे चैतन्य प्रक्षेपित होत होते.

ई. समष्टी भावामुळे श्री रामललाच्या मूर्तीतील एकूण चैतन्यात वाढ होऊन तिचे सजीवतेकडे मार्गक्रमण चालू झाले. काही वर्षे भक्तीयुक्त पूजा केल्यानंतर मूर्तीतील सजीवतेची प्रत्यक्ष अनुभूती येऊ शकेल.

उ. श्री रामललाच्या मूर्तीचे उर्ध्वगामी डोळे श्री रामललाची आनंदावस्था आणि भाव यांचे प्रतीक आहे. यामुळे श्री रामललाच्या उर्ध्वगामी डोळ्यांतून भाव आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होत होती.

ऊ. श्री रामललाने हातात धरलेले धनुष्य आणि बाण यांतून मारक शक्ती प्रक्षेपित होत होती.

५. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचे सूक्ष्म स्तरावर जाणवलेले परिणाम

५ अ. श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारी शक्ती आणि तिच्यामुळे होणारे कार्य

५ आ. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचे अन्य काही लाभ

१. भारताची रज-तमप्रधान गुणांतून रज-सत्त्व या टप्प्याकडे वाटचाल चालू होणे

२. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेेमुळे महामारीचे संकट, आर्थिक संकटाची झळ, युद्धजन्य परिस्थिती अशा आपत्काळाच्या तीव्रतेत काही प्रमाणात घट झाली.

३. ‘श्री रामललाचे मंदिर व्हावे’ या विचारांमुळे अडकलेले जीव आणि हुतात्मा यांना पुढची गती प्राप्त झाली. यामुळे एक प्रकारे भू, भूव आणि स्वर्ग या तिन्ही लोकांची शुद्धी झाली.

५ इ. श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा सृष्टीवर झालेला परिणाम

६. कृतज्ञता

‘सर्वांना मर्यादायुक्त लीलांद्वारे आनंद देणारे आनंदघन श्रीराम आणि श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या ‘न भूतो न भविष्यति ।’ अशा झालेल्या या सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण करून ते लिहिता आले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४, दुपारी १.१५ ते दुपारी २.३०) (समाप्त)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक