श्रीराम या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. यामुळेच श्रीकृष्णाप्रमाणे ‘श्रीराम’ या नावामध्ये ‘श्री’च्या नंतर पूर्णविराम नाही; कारण श्रीराम हा स्वतःच भगवंत आहे. असा हा श्यामवर्ण, कमलनेत्र, आनंददायी अन् वात्सल्यमूर्ती श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत ! रामभक्तांनो, आपल्या परम श्रद्धेय श्रीरामाची उपासना आपण विविध प्रकारे करत असतो; परंतु श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेतल्यास उपासनेशी संबंधित कृती योग्यरित्या करणे सुलभ होईल.