Pakistan Anti-Hindu Maulana : पाकिस्तानमध्ये हिंदुविरोधी मौलानाची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक)

मौलाना मसूद उर रहमान उस्मानी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथे अज्ञातांनी Maulana shot dead by unknown persons in Pakistan याची गोळ्या झाडून हत्या केली. तो ‘सुन्नी उलेमा काऊन्सिल’चा उपाध्यक्ष होता. हिंदू आणि शिया मुसलमान यांच्या विरोधात तो विद्वेषी प्रसार करत होता. मौलाना उस्मानीने अनेकदा भारताच्याही विरोधात गरळओक केली होती.

(सौजन्य :DawnNews)

दुचाकीवरून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी त्याला दिवसाढवळ्या भररस्त्यात गोळ्या झाडून ठार मारल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ही हत्या कोणत्या उद्देशाने झाली ? हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. या हत्येमागे इराणचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.