तोच आपुला सनातन हिंदु धर्म ।

प्रतिदिन दिवस उगवत असतो । प्रतिदिन तो मावळत असतो ।
तोच तोच सूर्य पुन्‍हा ।
आकाशी दिसत असतो ॥ १ ॥

श्री. दत्तात्रय पटवर्धन

तेच तेच आकाश ।
सूर्य चंद्र ही तेच ।
तीच तीच धरा ।
वृक्षवल्ली प्राणी तेच  ॥ २ ॥

डोंगर पर्वत तेच तेच । समुद्र नद्या नालेही तेच ।
लौकिक अर्थाने जरी जुने । तरी जुने ते असते सोने ॥ ३ ॥

असा हा सारा विश्‍व पसारा । युगायुगाचा जुना साजिरा ।
तरीही नवा वाटतो । नित्‍य नूतन सनातन खरा ॥ ४ ॥

यातले कुणीही पालटत नाही । धर्म आपुला सोडत नाही ।
माणसे मात्र पालटतात । धर्म सोडूनी अधर्मी होतात ॥ ५ ॥

निसर्ग पशूपक्षांकडून घ्‍या । आपुला स्‍वधर्म शिकून ।
त्‍यातच आहे मानवी हिताचे मर्म । तोच आपुला सनातन हिंदु धर्म ॥ ६ ॥

– श्री. दत्तात्रय पटवर्धन (वय ७० वर्षे), कोलगाव, सावंतवाडी, जिल्‍हा सिंधुदुर्ग (८.११.२०२३)