चेन्नई – येथील ‘श्री टीव्ही’ या हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब वाहिनीने ८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. त्या निमित्ताने चेन्नईमधील श्री गुरु बालाजी कल्याण मंडपम् येथे ‘श्री टीव्ही’चा ८ वा स्थापनादिन साजरा करण्यात आला. सनातन संस्थेचे साधक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला ३०० हून अधिक जण उपस्थित होते.
सनातन संस्थेचा ‘श्री टीव्ही’चे संस्थापक श्री. बालगौथमंजी यांच्याशी जवळचा संबंध आहे. सनातन संस्थेने ‘श्री टीव्ही’साठी अध्यात्मातील विविध विषयांवर व्हिडिओ सिद्ध केले आहेत. दीपप्रज्वलन आणि वेदमंत्रपठण यांद्वारे कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर ‘हिंदु मुन्नानी’चे (हिंदू आघाडीचे) संस्थापक स्वर्गीय रामगोपालन्जी यांनी लिहिलेल्या गीतावर नृत्य सादर करण्यात आले. या वेळी ‘श्री टीव्ही’ आणि तिचे विविध कार्यक्रम यांवर आधारित एक ध्वनीचित्रफित दाखवण्यात आली. ‘श्री टीव्ही’च्या एक संचालिका सौ. प्रिया वेंकट यांनी ‘श्री टीव्ही’च्या कार्याविषयीची माहिती आणि त्यांच्या वाहिनीसाठी निःस्वार्थपणे सेवा करणार्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली, तसेच त्यांनी ‘श्री टीव्ही’ला हिंदुद्रोही द्रमुक अन् साम्यवादी पक्ष यांच्याकडून झालेल्या विरोधाविषयी माहिती सांगितली. याचसमवेत त्यांनी त्यांच्या विरोधात दिलेल्या कायदेशीर लढ्यावरही प्रकाश टाकला.
ஸ்ரீடிவி8ஆம்ஆண்டுவிழா | #ஸ்ரீடிவி_சாதித்ததுஎன்ன ? #ப்ரியாவெங்கடாத்ரி | #shreetv | #8thanniversary |
ஸ்ரீ டிவி 8 ஆம் ஆண்டு விழா நிகழ்ச்சி அக்டோபர் 28 ந்தேதி சென்னையில் நடைப்பெற்றது. இந்நிகழ்ச்சியில் ஸ்ரீ டிவியின் CEO திருமதி ப்ரியா வெங்கடாத்ரி அவர்கள்
— ShreeTV (@ShreeTV1) November 2, 2023
या कार्यक्रमाला ‘रामकृष्ण मठ, तंजावर’चे स्वामी विमुर्दानंद, ‘हिंदु मुन्नानी’चे राज्य प्रमुख श्री. कटेश्वर सुब्रमण्यम्, उपसंपादक कृष्णमूर्ती रामसुब्बु, दिनामलार, चेवलियार, वरिष्ठ पत्रकार डॉ. थिरिशक्ती सुंदरीमन, संपादक संध्या जैन आणि विजयवणी इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ஸ்ரீடிவி8ஆம்ஆண்டுவிழா | #ஸ்ரீடிவி_சாதித்ததுஎன்ன ? #ப்ரியாவெங்கடாத்ரி | #shreetv | #8thanniversary |
(सौजन्य : Shree TV)
‘श्री टीव्ही’च्या ८ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला त्यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. जयकुमार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. |