भाग्यनगर (तेलंगाणा) येथील क्रिकेट सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणाबाजी !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये १० ऑक्टोबर या दिवशी विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना झाला. या वेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित सहस्रो लोकांनी पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणाबाजी केली. याचा व्हिडिओही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यावरून प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

सौजन्य टीव्ही वन क्रिकेट 

प्रेक्षकांकडून पाकिस्तानच्या विजयासाठी घोषणा देण्यावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू रिझवान म्हणाला, ‘असे वाटत होते की, मी रावळपिंडी (पाकिस्तान) येथे खेळत आहे. प्रेक्षकांनी आम्हाला ज्या प्रमाणे प्रेम दिले, ते अद्भूत होते. हा सामना आम्हाला घरच्यासारखा वाटला.’ हा सामना पहाण्यासाठी भाग्यनगरच नव्हे, तर मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमधूनही लोक आले होते.

संपादकीय भूमिका

भाग्यनगर शहर मुसलमानबहुल आहे आणि आजही तेथे रझाकारांच्या वंशजांचे अस्तित्व आहे. त्यामुळे तेथे पाकिस्तानचे समर्थन केले जात असेल, तर आश्‍चर्य वाटू नये ! अशी स्थिती भारतातील बर्‍याच ठिकाणी अनुभवयला मिळते ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !