‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना साष्टांग नमस्कार !
१. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी प्रसाद बांधणीची सेवा करतांना अनुभवलेली गुरुकृपा !
‘या वर्षी १६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवासाठी देश-विदेशांतून पुष्कळ हिंदुत्वनिष्ठ आले होते. त्यांना प्रसाद देण्यासाठी आम्ही रामनाथी आश्रमातील प्रसाद भांडारात एक मास आधीच पुष्कळ प्रमाणात खाऊची मागणी केली होती. त्याप्रमाणे खाऊ येण्यास प्रारंभ झाला. प्रसाद भांडारात आम्ही मोजकेच साधक होतो; परंतु आपल्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपाशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीतपणे पार पडले. ही आम्हा सर्व साधकांसाठी मोठी अनुभूती होती. सेवा करतांना कुठेही ताणतणाव नव्हता. सर्व सेवा खेळीमेळीने पार पडली. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ पूर्ण होण्याआधीच आमच्याकडून प्रसादाच्या बांधणीची (पॅकिंग) सर्व सेवा पूर्ण होऊन, आम्ही तो प्रसाद महोत्सवाच्या स्थळी पाठवला.
२. प्रसादाची बांधणी (पॅकिंग) सेवा करतांना ती ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ या वचनाप्रमाणे होत असल्याचे अनुभवणे
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी प्रसाद भरण्याची सेवा करतांना सर्व सेवा ठरलेल्या वेळेत आणि नियोजनाप्रमाणे होत होत्या. सेवा करत असतांना प्रार्थना, कृतज्ञता, भाववृद्धीसाठी प्रयत्न आणि नामजप होत होता. सर्व सेवा ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (अर्थ : कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.) या भावाने झाल्या. त्यामुळे आम्हा सर्वांना पुष्कळ आनंद मिळत होता.
‘गुरुमाऊली, सर्व काही आपला संकल्प आणि कृपाशीर्वाद यांमुळेच झाले. आपणच आमच्याकडून ही सेवा करून घेतलीत, यासाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे. यापुढेही आम्हास असाच आनंद मिळावा आणि आमच्याकडून सेवा करवून घ्यावी’, हीच प्रार्थना आहे.’
– आपला चरणसेवक,
श्री. देवदत्त कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ८१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |