मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने दंगलीचे वास्तव उघड करणारा लेख…
‘११ ऑगस्ट २०१२ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल. याच दिवशी आझाद मैदानाच्या परिसरात धर्मांध मुसलमानांनी दंगल घडवली. महाराष्ट्रात त्यापूर्वीही दंगली झाल्या; परंतु या दंगलीमध्ये धर्मांधांनी महिला पोलिसांच्या कपड्यांना हात घातला. आझाद मैदानातील हुतात्मा सैनिकांच्या स्मारकाला धर्मांधांनी लाथ मारून त्याची नासधूस केली. ‘पोलिसांचा उपमर्द आणि महिला पोलिसांचा विनयभंग करूनही देशद्रोह करणार्या धर्मांधांवर वचक बसेल’, अशी कारवाई या घटनेनंतर ११ वर्षांनीही न होणे, ही महाराष्ट्रातील पोलीस, प्रशासन अन् राजकारणी यांच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
एवढेच नव्हे, तर यांतील एकाही आरोपीकडून एक रुपयाचीही हानीभरपाईची वसुली झालेली नाही, हेही लांच्छनास्पद आहे. पोलीस, प्रशासन आणि राजकारणी यांनी या घटना सौम्यतेने हाताळल्या असल्या, तरी या दंगलीची भीषणता काय होती ? हे हिंदूंनी कायम लक्षात ठेवायला हवे. हिंदु समाज हे आघात विसरून गेला, तर भविष्यात हिंदूंचा निभाव लागणार नाही. न्यायालयात या दंगलीतील दोषींना शिक्षा कधी होईल ? कि ते निर्दोष सुटतील ? हे आपणाला सांगता येणार नाही; मात्र सध्याची महाराष्ट्रातील वाढती धर्मांधता लक्षात घेता हिंदूंनी मात्र या घटनेचे स्मरण ठेवावे, यासाठी हा लेखप्रपंच !
१. दंगलीची पार्श्वभूमी !
म्यानमारमध्ये मुसलमानांवर अत्याचार झाल्याच्या कारणास्तव ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी भेंडीबाजार ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ‘मदिना तुलम फाऊंडेशन’कडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र ‘रझा अकादमी’, ‘अमन कमिटी’ आणि अन्यही काही मुसलमान संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात १ सहस्र जण सहभागी होतील, असे अनुमतीसाठी करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात १५ सहस्रांहून अधिक मुसलमान आझाद मैदानात आले. या वेळी जाणीवपूर्वक चिथावणीखोर वक्तव्ये करून मुसलमानांना उकसवण्यात आले आणि म्यानमार
येथील घटनेवरून दंगल घडवण्यात आली. भाषण चालू असतांना सहस्रो मुसलमान आझाद मैदानाच्या बाहेर आले. पोलिसांनी लाठीमार, अश्रूधूर यांचा उपयोग करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना न जुमानता जमावाने पोलिसांवरच आक्रमण केले. पोलिसांची शस्त्रे खेचली. महिला पोलिसांचा विनयभंग केला. पोलीस, पत्रकार, मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्या गाड्या जाळल्या. या प्रकरणी केवळ ६३ जणांना अटक करण्यात आली, गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र या प्रकरणाचा खटला अद्याप न्यायालयात चालू झालेला नाही.
(सौजन्य : Channel G)
२. पोलीस, प्रशासन आणि राजकारणी यांच्या नाकर्तेपणाची परिसीमा !
या प्रकरणातील ६० आरोपींची नावे निश्चित करण्यात आली आणि त्यांच्याकडून दंगलीची हानीभरपाई वसूल करण्याचा आदेशही जिल्हाधिकार्यांनी दिला; मात्र त्यावर पोलिसांनी ठोस कारवाई केलीच नाही. यामध्ये काही आरोपी मुंबई, नवी मुंबई, तर काही आरोपी ठाणे येथील आहेत. आरोपींचा पत्ता सापडत नसल्यामुळे; पत्ता सापडला, तर त्यांच्या नावाने मालमत्ता नसल्यामुळे, तर काही झोपडपट्टीत रहात असल्याची कारणे देऊन त्यांच्याकडून अद्याप एका रुपयाचीही हानीभरपाई वसूल करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या पोलिसांची अब्रू लुटणार्या या नराधमांविषयी पोलीस, प्रशासन आणि राजकारणी यांचे सौम्य धोरण हे व्यवस्थेविषयी चीड निर्माण करणारे आहे. ‘कुठे जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’, अशी तंबी देणारे शिवछत्रपती, तर कुठे जनतेच्या मालमत्तेची हानी करणार्या आणि महिलांची अब्रू लुटणार्यांविषयी सौम्य धोरण बाळगणारे आताचे राजकारणी !
३. अद्यापही सुनावणी न होणे, हा पीडित महिला पोलिसांचा अवमान !
११ वर्षांनंतरही या खटल्याची अद्यापही सुनावणी चालू झालेली नाही. यांतील सर्व आरोपी जामिनावर मुक्त आहेत. पोलिसांवर हात टाकणार्यांची काय गत होते, हे खरे तर शासन आणि प्रशासन यांनी दाखवून दिले असते, तर धर्मांधांवर वचक बसला असता. दंगलखोरांमध्ये महाराष्ट्र पोलिसांची जरब निर्माण झाली असती आणि न्यायव्यवस्थेचा दबदबा राहिला असता.
४. …यांना ‘मुसलमान बंधू’ कसे म्हणावे ?
या दंगलीच्या प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या काही महिला पोलिसांनी लिहिलेल्या जबाबामध्ये निदर्शनासाठी जमलेल्यांचा ‘मुसलमान बांधव’ असा उल्लेख केला आहे. ज्या जमावाने महिला पोलिसांचा विनयभंग केला, त्यांचे कपडे फाडले, दंगल घडवली, असे करूनही महिला पोलिसांनी त्या धर्मांध मुसलमानांविषयी ‘बांधव’ असा शब्दप्रयोग करणे, हे हिंदूंवर झालेल्या सर्वधर्मसमभावाच्या अतिरेकाचे लक्षण आहे. असे धर्मांध हे ‘बंधू’ म्हणायच्या लायकीचे नाहीत.
५. होय, औरंगजेबाची वृत्ती महाराष्ट्रात आहे !
या कार्यक्रमाच्या वेळी पहार्यासाठी महिला पोलीसही होत्या. धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले, त्या वेळी त्यांनी महिला पोलिसांनाही सोडले नाही. अक्षरश: महिला पोलिसांचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग केला. यामध्ये एका पोलीस महिलेने दिलेल्या जबाबामध्ये ‘यही मौका है, छोडो मत’ असे ओरडत धर्मांधाने तिचा हात धरल्याचे म्हटले आहे. अन्य एका पोलीस महिलेने ‘धर्मांधाने शर्ट ओढल्यामुळे शर्टची बटणे तुटली. या वेळी तेथे लपलेल्या एका व्यक्तीने स्वतःचा शर्ट काढून दिला’, असे जबाबात म्हटले आहे. एका पोलीस महिलेने धर्मांधाने मागून विजार (पॅन्ट) ओढल्याचे जबाबात म्हटले आहे. यातून हे धर्मांध कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, याची कल्पना येते. जेथे सर्वसामान्य माणूस पोलीस म्हटला की, चार हात दूर जातो, तेथे हे धर्मांध महिला पोलिसांवर हात टाकण्यासही मागे-पुढे पहात नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. ११ वर्षांनंतर जेव्हा महाराष्ट्रात औरंगजेबाची चित्रे सार्वजनिकरित्या फडकावली जातात, तेव्हा ही वासनांधता महाराष्ट्रात आणखी किती फोफावली असेल, याची कल्पना येते. भविष्यासाठी ही धोक्याची घंटा आहे, हे प्रथम पोलिसांनी समजून घेणे आवश्यक आहे.
६. रझा अकादमीचे धारिष्ट्य आणखी वाढले !
या दंगलीमध्ये रझा अकादमीचा सहभाग स्पष्ट झाला; मात्र त्यानंतरही या संघटनेवर ठोस कारवाई होऊ शकली नाही. उलट सबळ पुराव्यांच्या अभावी रझा अकादमीच्या महंमद सईद शफी अहमद नुरी याचे नाव थकबाकीदारांच्या सूचीतून काढून ‘त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करू नये’, असा आदेश जिल्हाधिकार्यांनी दिला. तसेच या दंगल प्रकरणी पोलिसांकडून अद्यापही कोणतीच कारवाई न झाल्यामुळेच रझा अकादमीचे धारिष्ट्य वाढले. पुढे महाराष्ट्रात धर्मांधांनी घडवलेल्या दंगलींमध्ये रझा अकादमीचा सहभाग आढळून आला. त्यामुळे ‘आझाद मैदान दंगल ही रझा अकादमीची धर्मांधता वाढवण्यालाच कारणीभूत ठरली’, असे म्हणावे लागेल.
‘दंगल घडवूनच नव्हे, तर पोलिसांवर हात टाकूनही आम्ही मोकाट सुटू शकतो’, याचा विश्वास या दंगलीनंतर धर्मांधांमध्ये निर्माण झाला. ‘दंगल केल्यास काय परिणाम होईल ?’, याचा १०० वेळा विचार करायला लावेल’, अशी जरब खरे तर या दंगलीनंतर पोलीस, प्रशासन आणि राजकारणी यांनी निर्माण करायला हवी होती; मात्र तसे झाले नाही. ही जरब वेळीच बसली असती, तर सद्यःस्थितीत महाराष्ट्रात औरंगजेबाचे फलक झळकले नसते, हे मात्र निश्चित ! त्यामुळे भविष्यात धर्मांधतेला वेसण घालण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी छत्रपती शिवरायांनी घालून दिलेल्या वैध मार्गाचा अवलंब करण्यावाचून पर्याय नाही.
– श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई (९.८.२०२३)
हे ही वाचा –
♦ मुंबईतील आझाद मैदान दंगलीला ११ वर्षे होऊनही अजूनही खटल्याची सुनावणी नाही !
https://sanatanprabhat.org/marathi/709834.html
♦ Even after 11 years, no compensation for losses during Azad Maidan riots !
https://sanatanprabhat.org/english/75760.html