मुंबईतील आझाद मैदान दंगलीला ११ वर्षे होऊनही अजूनही खटल्याची सुनावणी नाही !

  • दंगलखोरांकडून हानीभरपाईची वसुली नाही

  • आरोपी मात्र मोकाट !

मुंबईतील आझाद मैदान दंगल

मुंबई – आझाद मैदानात ११ ऑगस्ट २०१२ या दिवशी धर्मांध मुसलमानांनी घडवून आणलेल्या पूर्वनियोजित दंगलीला ११ ऑगस्ट २०२३ या दिवशी ११ वर्षे पूर्ण होत आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या एवढ्या कालावधीनंतरही या दंगलीचा खटला अद्याप न्यायालयात चालूही झालेला नाही. एवढेच नव्हे, तर दंगलखोरांनी सार्वजनिक मालमत्तेची हानी करूनही त्यांच्याकडून एका रुपयाचीही वसुलीही पोलीस किंवा प्रशासन करू शकलेले नाही.

१. या दंगलीमध्ये धर्मांधांनी २६ पोलीस वाहनांची तोडफोड केली. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांचे स्मारक असलेले ‘अमर जवान ज्योती स्मारक’ धर्मांधाने लाथ मारून तोडून टाकले. रुग्णवाहिका, पत्रकारांची व्हॅन, महानगपालिकेच्या बसगाड्या आदींची धर्मांधांनी तोडफोड केली.

२. आझाद मैदानातील कार्यक्रमासाठी १५ सहस्रांहून अधिक जण सहभागी होऊनही केवळ ६२ जणांकडून हानीभरपाई वसुलीचा आदेश देण्यात आला आहे. यांतील १८ जण मुंबई येथे, ३९ जण नवी मुंबई आणि उपनगर भागात, तर ५ जण ठाणे येथे रहाणारे आहेत. यांतील २ जणांची नावे वगळण्यात आली आहेत; मात्र यांतील अनेक जण संबंधित पत्त्यावर उपलब्ध नाहीत, असतील तर त्यांच्या नावे मालमत्ता नाही आदी कारणे देत पोलीस आणि प्रशासन यांनी या प्रकरणी बोटचेपे धोरण स्वीकारले आहे.

३. महिला पोलिसांचा विनयभंग, क्रांतीकारकांचा अवमान, पोलिसांवरील आक्रमण, सार्वजनिक मालमत्तेची हानी, माध्यमांवर आक्रमण आदी गंभीर कृत्ये करूनही या दंगलीतील आरोपी जामिनावर मोकाट आहेत.

संपादकीय भूमिका

  • दंगलखोरांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना शिक्षा झाली नाही, तर ते पुनःपुन्हा समाजविघातक कृत्ये करतच रहाणार !
  • आझाद मैदानात दंगल घडवणारे ११ वर्षांनंतरही मोकाट असणे, हे  पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी यांना लज्जास्पद !