भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) एकाच वेळी केले सिंगापूरच्या ७ उपग्रहांचे प्रक्षेपण !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) ३० जुलै या दिवशी सिंगापूरच्या ७ उपग्रहांचे प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण ४४.४ मीटर लांबीच्या ‘पीएस्एल्व्ही-सी५६’ या रॉकेटद्वारे करण्यात आले. पीएस्एल्व्हीचे हे ५८ वे उड्डाण आहे.

पाठवलेल्या ७ उपग्रहांपैकी ‘डीएस्-एस्एआर्’ हा सर्वांत महत्त्वाचा उपग्रह आहे. हा उपग्रह सिंगापूर सरकारच्या विविध यंत्रणांच्या आवश्यकता पूर्ण करणार आहे.