राज्यातील २० सहस्र शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा नाही ! – शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, २८ जुलै (वार्ता.) – राज्यात जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अशा एकूण १ लाख ९ सहस्र ६०५ शाळांची नोंद आहे. यांतील ८९ सहस्र ५६० शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. उर्वतिर २० सहस्र ४५ शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा बसवण्याची सूचना देण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले. याविषयी २८ जुलै या दिवशी आमदार कुणाल पाटील यांनी राज्यातील खासगी आणि जिल्हा परिषद यांच्या शाळांमध्ये अग्नीशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी वरील माहिती दिली.