बरेली (उत्तरप्रदेश) कावड यात्रेकरूंवरील दगडफेकीच्या प्रकरणी माजी नगरसेवक उस्मान अल्वी याला अटक !

अल्वी याने कावड यात्रेकरूंना ठार मारण्याचे आवाहन केल्यानंतर चालू झाली होती दगडफेक !

माजी नगरसेवक उस्मान अल्वी

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील वनखंडी मंदिराच्या आधी एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्मान अल्वी, मशिदीचा मौलाना (इस्लामचा अभ्यासक) आणि त्याचा मुलगा, सलीम शाह, छोटे शाह, मम्मा ढोल, राशिद मुखबिर, वाहिद, चांद महंमद, गुड्डू, सरदार शाह, भूरा आदी १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यांतील उस्मान अल्वी याला पोलिसांनी अटक केली आहे. तो येथील माजी नगरसेवक आहे. या दगडफेकीत महिलांसह काही कावड यात्रेकरू घायाळ झाले होते. विशेष म्हणजे ही घटना घडली, तेव्हा पोलीस येथे उपस्थित होते.

(सौजन्य : दस्तक टाईम्स) 

कावड यात्रेकरूंनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मशिदीजवळून जात असतांना उस्मान अल्वी याने मोठ्या आवाजात ‘या लोकांना ठार मारा’, असे चिथावणीखोर विधान केले. यानंतर मशिदीच्या छतावरून दगडफेक करण्यात आली.

गुलाल उडाल्याने मुसलमानांकडून दगडफेक !

मुसलमानांनी दावा केला आहे की, कावड यात्रेकरूंच्या मिरवणुकीमध्ये चित्ररथ होता आणि तेथे गुलाल उधळण्यात येत होता. तेथे एक पंखा होता. चित्ररथ मशिदीजवळ आल्यानंतर पंख्याची दिशा तिच्याकडे करण्यात आली. त्यामुळे पंख्याच्या हवेमुळे गुलाल मशिदीजवळ उभ्या असणार्‍या लोकांवर तो उडाला आणि वाद होऊन दगडफेक झाली. (केवळ गुलाल उडाल्याने हिंदूंच्या धार्मिक यात्रेवर आक्रमण केले जाते; मात्र दिवसांतून ५ वेळा मशिदींतून ‘अल्लापेक्षा कुणीही महान नाही’ अशा प्रकारचे कर्णकर्कश आवाजात सांगण्यात येते त्याविषयी अन्य धर्मीय मौन रहातात, हे निधर्मीवादी कधी लक्षात घेतील का ?- संपादक)

संपादकीय भूमिका 

  • मणीपूरमधील घटनेवर बोलणारे राजकीय पक्ष बरेलीच्या घटनेविषयी का बोलत नाहीत ? येथे मार खाणारे हिंदू आणि मारणारे मुसलमान असल्यामुळेच ते गप्प आहेत. जर याउलट घटना घडली असती, तर हे राजकीय पक्ष तुटून पडले असते !
  • दगडफेक होणार्‍या मशिदींवर उत्तरप्रदेश सरकार बुलडोझरद्वारे कारवाई करणार का ?, असा प्रश्‍न कायदाप्रेमी लोकांनी विचारला, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • भक्तीऐवजी शक्तीप्रदर्शन करणारी मंदिरे बंद करण्याचे विधान न्यायव्यवस्थेकडून केले जाते, तेव्हा जेथून खर्‍या अर्थाने हिंसा केली जाते, त्या प्रार्थनास्थळांवर बंदी घालण्याविषयी कुणीच कधी का बोलत नाही ?