उत्तरप्रदेशमध्ये धर्मांध प्रियकराकडून पीडित हिंदु मुलीला धमकी
झांशी (उत्तरप्रदेश) – येथे ‘लव्ह जिहाद’ चे एक प्रकरण समोर आले आहे. येथील एका धर्मांध तरुणाने एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. मुलीने लग्न करण्याविषयी विचारले असता आरोपीने तिच्यावर धर्मांतर करून बुरखा घालण्यासाठी दबाव आणणे चालू केले. ‘धर्मांतर करण्यात नकार दिला, तर तुझे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालीन’, अशी धमकी धर्मांध प्रियकराने पीडितेला दिली. पीडितेने चिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
पीडित मुलीने सांगितले की, ‘वर्षभरापूर्वी हनिफ खान नावाच्या मुसलमान तरुणाने माझ्याशी मैत्री केली. त्यानंतर हळूहळू त्याने मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्याने मला लग्न करण्याचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले. झांशीतील चिरगाव येथे दोघे भाड्याच्या खोलीत एकत्र राहू लागलो. ८ जून २०२३ या दिवशी मी लग्नाचा विषय काढला असता हनीफने मला धर्मांतर करून इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. त्यास मी नकार दिला. त्यामुळे त्याने माझ्यावर अत्याचार करणे चालू केले. माझे तुकडे करून कुत्र्याला खाऊ घालण्याची धमकी त्याने मला दिली.’
या प्रकरणी अन्वेषण चालू आहे, असे चिरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी जे.पी. पाल यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका
|