‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – करणी सेनेची मागणी

करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सूरजपाल अम्मू

गुरुग्राम (हरियाणा) – सेन्सॉर बोर्डात बसलेल्यांना जोडे मारायला हवेत, ज्यांनी हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. सेन्सॉर बोर्डाचे कायदे पालटण्याची आवश्यकता आहे.  पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे. करणी सेनेचे कार्यकर्ते चित्रपटगृहात गेले, तर मनोज मुंतशीर यांची लंका जाळून जाईल. त्यामुळे सरकारने ‘आदिपुरुष’सारख्या चित्रपटांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांनी केली आहे.

(सौजन्य : IndiaTV)

सूरज पाल अम्मू पुढे म्हणाले की, निर्मात्यांमध्ये धाडस असेल, तर महंमद पैगंबर आणि शिखांचे गुरू यांच्यावर असा चित्रपट बनवून दाखवला पाहिजे. तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल.