ठाणे, १५ जून (वार्ता.) – तक्रारदार यांच्या वडिलांविरुद्ध नोंद असलेल्या गुन्ह्याच्या अन्वेषणात साहाय्य करण्यासाठी उरण पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक सौ. सिंधु तुकाराम मुंडे यांनी ६० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ठरलेली ५० सहस्र रुपयांच्या लाचेची रक्कम घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कह्यात घेतले आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा करायला हवी ! – संपादक)