ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका ‘वेब पोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘मोगल हे भारतावर आक्रमण करण्यासाठी आले नव्हते, तर भारताला स्वत:ची मातृभूमी बनवण्यासाठी आले होते’, असे विधान करत मोगलांविषयी चुकीची माहिती पसरवली जात असल्याची वल्गना केली. अशा प्रकारे वल्गना करणारे मोगल आणि औरंगजेब प्रेमी असलेले नसीरुद्दीन शाह हे काही एकमेव नाहीत. यांच्या गोतावळ्यात आणखीही अनेक मोगलप्रेमी आहेत. ज्यांना भारतभूमीसाठी त्याग केलेल्या राष्ट्रपुरुषांचा अभिमान वाटत नाही; परंतु या देशाला लुटण्यासाठी आलेल्यांच्या प्रतिमा भंजनाची काळजी वाटते. याचे कारण स्पष्ट आहे. या देशावर आक्रमण करण्यासाठी आलेल्यांना ते आपले मानतात. भारतात असलेले मुसलमान हे मोगलांचेच वंशज आहेत, तर काही बाटलेले हिंदू आहेत. यांतील कुणी का असेना, जर भारताच्या राज्यघटनेविषयी, लोकशाहीविषयी आणि सर्वधर्मसमभावाविषयी त्यांना आत्मीयता वाटत असेल, तर त्यांनी भारताला लुटण्यासाठी आलेल्यांचा धिक्कार करून देशातील उदात्त संस्कृतीचा अवलंब करायला हवा; मात्र असे न करणार्यांचा हेतू स्वच्छ नाही. ‘भारतावर आक्रमण करणार्या मोगलांचा हिंदूंनी सन्मान करावा’, असे त्यांना वाटते; परंतु देशाचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांसारख्या असंख्य राष्ट्रपुरुषांविषयी नसिरुद्दीनसारख्यांच्या तोंडून कधी गौरवोद्गार निघाल्याचे ऐकिवात नाही. नसिरुद्दीन शाह हे एक लौकिक मिळवलेले कलावंत असले, तरी त्यांची विचारसरणी मात्र धर्मांध आहे. ते मुसलमान असूनही हिंदूंनी त्यांच्या कलेला स्वीकारले, मानसन्मान दिला; मात्र तो प्राप्त करूनही त्यांना भारताच्या संस्कृतीविषयी आत्मीयता वाटत नाही, हे हिंदूंनी समजून घ्यायला हवे. कलाकाराला धर्म नसतो; परंतु असे काही कलाकार मुळातच धर्मांध आहेत त्यांचे काय ? हिंदी चित्रपटसृष्टीमधील आमीर खान, शबाना आझमी, गीतकार जावेद अख्तर अशी काही ज्येष्ठ मंडळी अधूनमधून हिंदु धर्मावर गरळओक करत असतात. नसीरुद्दीन शाह हेही त्यातीलच एक आहेत.
राज्यघटनेचा पुरस्कार कधीपर्यंत ?
नुकतेच नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी हिंदु पुरोहितांद्वारे झालेल्या वेदपठणामुळे एम्.आय.एम्.चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भारतात राज्यघटना धोक्यात आली आहे’, अशी वल्गना केली. ज्या वेळी मुसलमान देशात दंगली घडवतात, त्या वेळी ओवैसी यांना राज्यघटना धोक्यात आली आहे, असे वाटत नाही; परंतु हिंदूंच्या धार्मिक पद्धतीने संसद भवनाचे उद्घाटन म्हणजे ओवैसीसारख्यांना राज्यघटनेवरील धोका वाटतो. राज्यघटनेवरील हे ‘पुतना मावशीचे प्रेम’ म्हणावे लागेल. अफझलखानाच्या कबरीच्या भोवतालचे हटवण्यात आलेले अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानुसार हटवण्यात आले होते; मात्र त्या वेळी राज्यशासनावर असदुद्दीनने ओवैसी यांनी टिका केली होती. यांचेच बंधू अकबरूद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेऊन फुले वाहिली होती. ‘ज्यांना औरंगजेब आपला वाटतो, ते राज्यघटनेचा अंगीकार करतील’, यावर कोण विश्वास ठेवेल ? त्यामुळे राज्यघटना, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये तोपर्यंतच आहेत, जोपर्यंत भारतात मुसलमान अल्पसंख्य आहेत. भारतात मुसलमान बहुसंख्य होतील, तेव्हा ते शरियत कायद्याप्रमाणे नव्हे, तर देशाच्या राज्यघटनेप्रमाणे कारभार करतील, याची शाश्वती एक तरी घटनाप्रेमी देईल का ?
हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे !
मुसलमान बहुसंख्य होतील, तेव्हा नसीरुद्दीन शाह ज्यांची स्तुती करत आहेत त्यांचे गौरव करण्यात येतील, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये लाखो हिंदूंचे शिरकाण करणारा क्रूरकर्मा टिपू सुलतान असेल, हिंदू म्हणून रहाण्यासाठी जिझिया कर लावणारा औरंगजेब असेल किंवा महंमद खिलजीपासून हिंदूंचा वंशविच्छेद करून भारताला इस्लामी राष्ट्र करायला निघालेले सर्व मोगल राज्यकर्ते असतील. नसीरुद्दीन शाह यांच्या मनात जे कुणी मोगल असतील त्या सर्वांनी हिंदूंची मंदिरे, परंपरा नष्ट करून इस्लामी कायदे लागू केले, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नसिरूद्दीन यांच्या मनात काय आहे, हे हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे. त्यामुळे लोकशाहीचा बुरखा पांघरून भारतावर आक्रमण करणार्या धर्मांधांचे समर्थन करणार्यांचे खरे स्वरूप हिंदूंनी समजून घ्यायला हवे आणि ते ज्यांचे समर्थन करत आहेत त्या इस्लामी आक्रांतांचे क्रौर्य देशापुढे मांडायला हवे. मागील अनेक वर्षांत काँग्रेसने मोगलांचे वास्तव देशापुढे ठेवले नाही. टिपू सुलतान याने लाखो हिंदूंची कत्तल केली; मात्र ‘स्वातंत्र्यसेनानी’ म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. आजही टिपू सुलतान याला ‘क्रूरकर्मा’ म्हटले जाते, त्या वेळी; अफझलखान वधाचे चित्र लावल्यावर मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातात. त्याची पुनरावृत्ती आजही चालूच आहे. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण हा त्याचाच भाग आहे. भविष्यात ‘याकूब मेमन हाही भारतामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठीच बाँबस्फोटाच्या कटात सहभागी झाला होता’, असे नसीरुद्दीन शाह यांची पुढची पिढी सांगेल, याविषयी मुळीच शंका वाटण्याचे कारण नाही.
आज नसीरुद्दीन शाह मोगलांची स्तुती करत आहेत, तर सुफी संत म्हणून ओवैसी औरंगजेबाच्या कबरीपुढे डोके टेकत आहे. या धर्मांधांचा उदो उदो करण्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे भारताचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसने मतांसाठी इस्लामी आक्रमकांचा खरा क्रूर इतिहास लपवून ठेवला, ही वस्तूस्थिती आज भारतियांपुढे येणे आवश्यक आहे. हे झाले नाही, तर ‘मोगलांना शांतीदूत’ म्हणणारे असंख्य लोकशाहीचे तथाकथित पुरस्कर्ते सिद्ध होतील. त्यामुळे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव यांसारख्या शब्दांचा वापर करून हिंदूंना निष्प्रभ करणार्या तथाकथित पुरो(अधो) गाम्यांच्या भूलथापांच्या आहारी न जाता हिंदूंनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी कटिबद्ध व्हावे !
‘आक्रमणकर्त्यांचा पुरस्कार म्हणजे भारताच्या इस्लामीकरणाचा अजेंडा होय’, हे हिंदूंनी वेळीच समजून घ्यावे ! |