
‘अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात ५ भाविकांवर हरियाणातील यमुनानगर येथील रहिवासी असणार्या झुल्फान नावाच्या तरुणाने लोखंडी सळईने आक्रमण केले. ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाच्या साहाय्याने झुल्फान याला पकडून पोलिसांच्या हातात देण्यात आले. दुसर्या घटनेत अमृतसर येथील ठाकुरद्वार मंदिरावर हातबाँब फेकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.’ (१६.३.२०२५)