घरच्या घरी लागवड करण्याचे गांभीर्य जाणून कृतीशील होऊया !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘जागतिक तापमान वाढ’ आणि ‘हवामानात होणारे पालट’ हे आता केवळ वर्तमानपत्रात वाचण्याचे शब्द राहिले नसून त्यांची झळ आपल्या दैनंदिन जीवनात सर्वांना जाणवू लागली आहे. अवेळी पडणारा पाऊस, उष्णतेची लाट आणि अकस्मात् वाढणारा गारवा यांचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने शेतमालाच्या दरातही वाढ होत आहे. ‘पुढे ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते’, असे भाकीत केवळ संतच नाहीत, तर अनेक शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ञही सांगत आहेत. सर्व जण शेती करू शकत नाहीत; पण न्यूनतम घराजवळ उपलब्ध असलेल्या जागेनुसार फळे, भाजीपाला अन् औषधी वनस्पती यांची लागवड केली, तर आपण काही प्रमाणात स्वावलंबी होऊ शकतो. आतापासूनच कृती करण्यास आरंभ केला, तर लागवड शिकून घेण्यास पुरेसा कालावधी मिळून आपल्याला पुढील काळात त्याचे पुष्कळ लाभ होणार आहेत.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१४.३.२०२३)

तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !

[email protected]