सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ज्योतिषशास्त्राद्वारे उलगडलेली वैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. व्यक्तीमत्त्वाचे प्रकार

ज्योतिषशास्त्रानुसार स्थूलमानाने व्यक्तीमत्त्वाचे ३ प्रकार असतात.

श्री. राज कर्वे

१ अ १. चर स्वभाव (गतीमान) : काही व्यक्ती जन्मतः गतीशील, कार्यतत्पर, महत्त्वाकांक्षी, धाडसी, पुढाकार घेणार्‍या आणि शारीरिक बळ असणार्‍या असतात. याला ज्योतिषशास्त्रात ‘चर स्वभाव’ म्हणतात. चर स्वभाव हा रजोगुण-प्रधान असून ‘क्रियाशक्ती’शी संबंधित आहे.

१ अ २. स्थिर स्वभाव : काही व्यक्ती एका जागी स्थिर रहाणार्‍या, उच्चपद प्राप्त करण्यासाठी धडपडणार्‍या, अधिकारीवृत्ती असणार्‍या, व्यवहारबुद्धी लाभलेल्या आणि सुखवस्तू असतात. याला ‘स्थिर स्वभाव’ म्हणतात. स्थिर स्वभाव हा तमोगुण-प्रधान असून ‘इच्छाशक्ती’शी संबंधित आहे.

१ अ ३. द्विस्वभाव : काही व्यक्ती कधी गतीमान, तर कधी स्थिर; तर्कशक्ती लाभलेल्या, विषयाच्या खोलात जाणार्‍या, ज्ञान मिळवण्यासाठी धडपडणार्‍या, बौद्धिक बळ असणार्‍या आणि विरक्त असतात. याला ‘द्विस्वभाव’ म्हणतात. द्विस्वभाव हा सत्त्वगुण-प्रधान असून ‘ज्ञानशक्ती’शी संबंधित आहे.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मूळ प्रकृती ‘द्विस्वभावी’ असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मूळ प्रकृती ‘द्विस्वभावी’ आहे. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, तर्कशक्ती, बौद्धिक बळ इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्यात मूलतः होती. पूर्वायुष्यात त्यांनी ‘संमोहन-उपचारतज्ञ’ म्हणून कार्य केले. ते करत असतांना त्यांनी त्यामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन केले. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्यांनी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आणि प्रत्यक्ष साधना चालू केली. यातून त्यांच्यातील जिज्ञासूवृत्ती लक्षात येते. त्यांना गुरुप्राप्ती झाल्यानंतर ते गुरूंना अध्यात्मासंबंधी अनेकानेक प्रश्न विचारत आणि गुरूंनी सांगितलेली उत्तरे लिहून ठेवत. यातून त्यांची ज्ञानप्राप्तीची तळमळ लक्षात येते. नंतर त्यांना गुरुकृपेने अंतर्मनातून प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. द्विस्वभावी व्यक्ती इतरांना ज्ञान देण्यासाठी तत्पर असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्माची महती समाजाला कळावी, म्हणून साधनाविषयक अभ्यासवर्ग चालू केले. त्यानंतर साधनाविषयक ध्वनिफिती, ग्रंथ आणि नियतकालिके प्रकाशित केली.

द्विस्वभावी व्यक्ती मायेपासून अलिप्त असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सिद्धी आणि प्रसिद्धी यांपासून दूर राहून समाजाला काळानुसार योग्य साधनेची शिकवण दिली. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या शंभरहून अधिक साधकांनी ‘संतपद’ प्राप्त केले असून शेकडो साधक संत बनण्याच्या मार्गावर आहेत. ही अद्वितीय अशी घटना आहे. आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगण्याची शिकवण देणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.२.२०२३)