उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गरबा मंडपात ओळख लपवून आलेल्या तीन मुसलमान तरुणांना चोपले !

पोलिसांनी कारवाई न करता सोडून दिले !

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील कालिदास अकादमी संकुलात १ ऑक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास गरबा कार्यक्रमामध्ये घुसलेल्या ३ मुसलमान तरुणांना पकडून त्यांना चोपण्यात आले.

मंडपामध्ये ३ मुसलमान तरुणांनी प्रवेश केल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर या मंडपातील सर्व तरुणांची तपासणी करण्यात आली. तसेच मंचावरून ‘येथे कुणी मुसलमान तरुण असतील, तर त्यांनी समोर यावे’, अशी घोषणा करण्यात आली. तेव्हा मुसलमान तरुण पळून जाऊ लागल्यावर त्यांना पकडण्यात आले आणि मंडपाबाहेर नेऊन चोपण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुटका करून पोलीस ठाण्यात नेले; मात्र ‘पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता रात्रीच तिन्ही तरुणांना सोडून दिले’, असे सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

जर अशा प्रकारचा गुन्हा केल्यानंतर कारवाई होणार नसेल, तर हे तरुण उद्या दुसरीकडे जाऊन अशाच प्रकारचा गुन्हा करतील ! त्यात ते एखाद्या हिंदु तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून फसवणूक करतील ! त्यामुळे मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हलगर्जीपणा पोलिसांकडून होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !