TTP Captures PAK Military Base : पाकच्या खैबर पख्तूनख्वामधील सैनिकी तळावर तालिबानचे नियंत्रण

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध चालू असून तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने पाकच्या खैबर पख्तूनख्वा येथील बाजौर जिल्ह्यातील सालारजई परिसरात पाकच्या सैन्य तळावर नियंत्रण मिळवले आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ टीटीपीकडून प्रसारित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी एका वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याचा हवाला देत संबंधित सैनिकी तळाला टीटीपीच्या आक्रमणाआधीच रिकामे करण्यात आले होते, असे सांगितले आहे. येथील सैनिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले होते. या प्रमाणेच उत्तर आणि दक्षिण वजीरिस्तानमध्येही काही सैनिकी तळ रिकामी करून सैनिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.